Bharat Bandh : पश्‍चिम भागामध्ये भारत बंदचा फारसा परीणाम नाही

राजकुमार थोरात
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये भारत बंदचा फारसा परीणाम जाणावला नाही. पश्‍चिम भागातील वालचंदनगर, जंक्शन, लासुर्णे, अंथुर्णे परीसरातील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना निवेदन देवून सरकारच्या महागाई वाढीचा व धोरणाचा निषेध केला. 

काँग्रेसच्या वतीने आज भारत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेने पाठिंबा दिला. दरम्यान गणेशउत्सव दोन, तीन दिवसावरती येवून ठेपला असल्याने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याची सक्ती केली नसल्यामुळे भारत बंदचा परीणाम फारसा जाणवला नाही. पश्‍चिम भागातील बहुतांश दुकाने सुरु होते. तसेच एस.टी. बसची वाहतुक सुरळीत सुरु होती. सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वालचंदनगरमध्ये जुन्या बसस्थानकजवळ थोडावेळ रास्तारोको आंदोलन केले.

मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष भिसे, राष्ट्रवादीचे बारामती लोकसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष नवनाथ धांडोरे, काँग्रेसचे इंदापूर अर्बन बँकेचे संचालक सत्यशिल पाटील, राष्ट्रवादीचे वालचंदनगर शहरचे अध्यक्ष तुषार घाडगे, अंकुश रणमोडे, इक्काबल शेख, शामराव कंदले, अमोल बोंद्रे, कुलदीप रकटे, श्रीनिवास पाटील, विजय पाटील, नितीन जाधव, सुरज बनसोडे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हवालदार शिवाजी सातव व मोहन फाळके यांना निवदेन देवून सरकारच्या महागाई वाढ व धोरणाचा निषेध केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Bandh : In the western part, there is not much effect of India Bandh