पुणे : 'भरत नाट्य' भरविणार पहिले संगीत नाट्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

भरत नाट्य संशोधन मंदिर पुण्यात पहिले संगीत नाट्य संमेलन भरविणार आहे.

पुणे : भरत नाट्य संशोधन मंदिर पुण्यात पहिले संगीत नाट्य संमेलन भरविणार आहे. येत्या चार तारखेपासून 12 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात संगीत नाट्य स्पर्धा, नाट्य-तंत्रज्ञ संमेलन होईल.

या संमेलनात संगीत शारदा, संगीत स्वरसम्राज्ञी, संगीत मत्स्यगंधा, संगीत ययाती आणि देवयानी, जय जय गौरीशंकर ही नाटके पाहता येणार आहेत. संमेलनातील सर्व कार्यक्रम भरत नाट्य मंदिर येथेच होतील, अशी माहिती संयोजक रवींद्र खरे आणि सुनील महाजन यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Natya Mandir will organise Sangit Natya Sammelan in Pune

टॅग्स