Pune News : शाळेच्या आवारात सिरींज आणि कंडोम आलेत कुठून? संतप्त पालकांचा सवाल

भवानी पेठेतील शाळेत वापरलेले सिरींज आणि कंडोम काही वर्ग खोल्या व मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात सापडल्याचा प्रकार उघडकीस आला.
syringe and condom
syringe and condomsakal

कँटोन्मेंट - भवानी पेठेतील वीर लहुजी वस्ताद साळवे, क्रमांक 86 ब याशाळेत वापरलेले सिरींज आणि कंडोम काही वर्ग खोल्या व मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे सिरींज आणि कंडोम आलेत कुठून असा सवाल संतप्त पालकांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपस्थित केला आहे.

हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने याची चौकशी होणं अत्यंत गरजेचे आहे. तसेच शाळेत सुरक्षारक्षक असताना ही असा प्रकार कसा घडू शकतो. या प्रकारामुळे आमच्या मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. तसेच शाळेत शिक्षकच नसल्याने अनेक विद्यार्थी शाळेत अनुपस्थित असतात. त्यात उपस्थित विद्यार्थीही मस्ती करण्यात दंग असतात. याचा सर्व परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी पालक विजय मोहिते यांनी केली आहे.

यासंदर्भात भवानी पेठ विभागातील प्रभारी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी शरद मेमाणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यावेळी मराठा आरक्षणाच्या सर्व्हे करिता सर्व शिक्षक कामाला लागले आहे. याविषयी शाळेला नोटीस बजावण्यात आली आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मेमाने यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com