‘भावसरगम’ची ‘सुवर्ण’मय वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

पुणे - महाराष्ट्रातील अनेक कवी, गायक, गायिका, वादक यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा, त्यांना नाव मिळवून देणारा आणि या माध्यमातून श्रोत्यांना मराठी गीतांची गोडी लावणारा ‘भावसरगम’ हा कार्यक्रम ५० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. यानिमित्ताने कार्यक्रमाचे निर्माते आणि ख्यातनाम संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जाहीर सत्कार २२ जानेवारी रोजी पुण्यात होणार आहे.

‘भावसरगम’ची सुरवात १९६६ मध्ये झाली. मोहन वाघ यांच्या कल्पनेतून आकाराला आलेल्या या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग मुंबईतील टिळक विद्यालयात झाला. त्या वेळी मंगेशकर, कुंदा बोकील आणि अरुण दाते हे गायक कलावंत एकत्र आले होते. त्यानंतर सहगायक, वादक, निवेदक, व्यवस्थापक बदलत गेले; पण ‘भावसरगम’ अव्याहतपणे सुरू आहे आणि पहिल्या कार्यक्रमापासून मंगेशकर स्वत: यात गात आले आहेत. 

कार्यक्रमाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने ‘भावसरगम ५० वर्षे’ हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. याची माहिती राधा मंगेशकर, मधुरा दातार, विभावरी जोशी, प्रशांत नासेरी आणि शिरीष रायरीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याआधी लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, आरती अंकलीकर, देवकी पंडित, पद्मजा फेणाणी, रवींद्र साठे, अनुराधा मराठे, हृषीकेश रानडे, मंजुश्री ओक, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल अशा वेगवेगळ्या पिढ्यांतील अनेक गायकांनी ‘भावसरगम’ कार्यक्रम गाजवला आहे.

वयाच्या सातव्या वर्षापासून मी गात आले असून, ‘भावसरगम’मध्ये गेल्या वीस वर्षांपासून गात आहे. या कार्यक्रमात सर्वांत जास्त गाणाऱ्या गायिकांपैकी मी एक आहे. उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल यांनीही यात अनेक वेळा सहभाग घेतला आहे. 
- राधा मंगेशकर, गायिका

पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे गाणे ऐकले की ‘गाणे फुलवायचे कसे’, हे आपल्याला शिकता येते. मी तर गाण्याकडे वळले ते त्यांच्यामुळेच. त्यांच्यासोबत गायला मिळणे, याचा आनंद शब्दांतून व्यक्त करता येणार नाही. 
- मधुरा दातार, गायिका

Web Title: bhavsaragam event