Bhide Wada : भिडेवाड्याच्या भूसंपादनासाठी जागामालक, भाडेकरूंना नोटीस

फुले दांपत्याने भिडे वाड्यात १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्याच्या स्मरणार्थ या वाड्यात राष्ट्रीय स्मारक केले जावे यासाठी महापालिकेत ठराव झाला होता.
Pune Bhide Wada
Pune Bhide Wadaesakal

पुणे - महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. तेथे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने वाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आज (ता. ४) प्रशासनातर्फे भूसंपादनासाठी जागा मालक व भाडेकरूंना नोटीस बजावून पंचनामा केला आहे. दरम्यान, भाडेकरूंनी जागा ताब्यात देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता, त्यावर न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

फुले दांपत्याने भिडे वाड्यात १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्याच्या स्मरणार्थ या वाड्यात राष्ट्रीय स्मारक केले जावे यासाठी महापालिकेत ठराव झाला होता. त्यानंतर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर जागा मालक व भाडेकरूंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये १३ वर्षानंतर महापालिकेच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

तेथेही महापालिकेच्या बाजूने निकाल देण्यात आला. तसेच एका महिन्याच्या आत ही जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले होते. भिडेवाड्यातील भाडेकरूंनी जागा ताब्यात देण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती ही याचिका देखील आज फेटाळून लावण्यात आली आहे.

न्यायालयाने दिलेली मुदत ३ डिसेंबरला संपल्याने महापालिकेने आज (ता. ४) भूसंपादनाची प्रक्रिया सुरु केली. आज सकाळी महापालिकेच्या भूसंपादन विभागाचे अधिकाऱ्यांनी भिडे वाड्यातील जागा मालक व भाडेकरूंना नोटीस देण्याचा प्रयत्न केला. पण तेथील बहुतांश ठिकाणचे दुकाने बंद होते. जागा त्यामुळे नोटीस देता आली नाही. त्यानुसार प्रशासनाने पंचनामा करून घेतला आहे. तसेच पुढील कारवाई महापालिका व पोलिसांमार्फत केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भिडे वाड्याची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. आज जागा मालक व भाडेकरूंना नोटीस बजावून पंचनामा केला आहे. आम्ही लवकरच जागा ताब्यात घेऊ.’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com