पुस्तकांचं गाव झाले दोन वर्षांचे, विविध कार्यक्रमांचे आयोजन 

Bhilar A Village of Books will Become two years
Bhilar A Village of Books will Become two years

पुणे : पुस्तकांचे गाव (भिलार) या अभिनव प्रकल्पास शनिवार 4 मे ला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. द्विवर्षपूर्तीच्या निमित्ताने भिलार येथे विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

यानिमित्ताने पुस्तक जाणून घेऊ या ही पुस्तकांविषयीचे सर्वांगीण मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आणि कौशल इनामदार यांचा 'अमृताचा वसा' हा साहित्यिक व सांगीतिक कार्यक्रम भिलारमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये शाहीर नंदेश उमप, दीपक करंजीकर, अर्चिस लेले अशा अनेक कलाकारांचा समावेश असणार आहे. तसेच बदलापूर येथील ग्रंथसखा भाषासंवर्धक श्‍याम जोशी हे या कार्यशाळेत पुस्तकांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

पुस्तकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ, आयएसबीएन क्रमांक, प्रकाशनपृष्ठ, दुर्मिळ पुस्तकांचे संशोधन, संदर्भ ग्रंथांचे वाचन, पुस्तकांची बांधणी, विविध ऋतूंमध्ये पुस्तकांची काळजी कशी घ्यावी, पुस्तकनिर्मितीत सहभागी होणाऱ्या सर्व घटकांचे कष्ट इ. पुस्तकाशी जोडलेल्या विविध मुद्द्यांबाबत या कार्यशाळेत रसिकांचे लक्ष वेधले जाणार आहे.

ग्रंथपालांसाठी आणि पुस्तकप्रेमींसाठीही अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या ह्या कार्यशाळेसाठी राज्याच्या ग्रंथालय संचालनालयानेही विविध ग्रंथालयांना उपस्थित राहण्यासंबंधी आवाहन केले आहे. या कार्यशाळेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसून पूर्वनोंदणी मात्र आवश्‍यक आहे. पूर्वनोंदणीसाठी 02168-250111 व 9545126007 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक, डॉ.आनंद काटीकर यांच्याकडून करण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com