दौंड शहरात घुसले भीमा नदीचे पाणी

प्रफुल्ल भंडारी
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

दौंड शहरातील पानसरे वस्ती, इंदिरा नगर, लक्ष्मी नगर, ईदगाह मैदान, वैदू वस्ती, खाटीक गल्ली, वडार गल्ली आदी ठिकाणी पुराचे पाणी आले आहे. येथील घरे पाण्यात गेल्याने 101 कुटुंबातील 549 नागरिकांना नगरपालिका, महसूल व पोलिस प्रशासनाच्या साह्याने स्थलांतरित करण्यात आले आहे.

 

सुरक्षित ठिकाणी 131 कुटुंबांचे स्थलांतर

 

दौंड : दौंड शहरात भीमा नदीच्या पुराचे पाणी घुसले असून 131 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

दौंड शहरातील पानसरे वस्ती, इंदिरा नगर, लक्ष्मी नगर, ईदगाह मैदान, वैदू वस्ती, खाटीक गल्ली, वडार गल्ली आदी ठिकाणी पुराचे पाणी आले आहे. येथील घरे पाण्यात गेल्याने 101 कुटुंबातील 549 नागरिकांना नगरपालिका, महसूल व पोलिस प्रशासनाच्या साह्याने स्थलांतरित करण्यात आले आहे. अग्रवाल हायस्कूल, मध्य रेल्वे गणेश हॉल व बाजारतळावरील विनावापर असलेल्या फिश मार्केट इमारतीमध्ये या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दिली.प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

दौंड-नगर रस्त्यावरील डॅफोडिल ग्रीन या निवासी संकुलातील पार्किंगमध्ये साडेतीन फूट पाणी आले असून सर्व इमारतींना पाण्याने वेढले आहे. या संकुलातील तीस कुटुंबांनी हॉटेलमध्ये आश्रय घेतला आहे. शहरात सोमवारी सायंकाळी सात वाजता स्मशानभूमीच्या पुढे कपिलेश्वर मंदिरापर्यंत पुराचे पाणी आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhima river fioods water in dound city