भीमा नदीला जलपर्णीचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

रांजणगाव सांडस - रांजणगाव सांडस - आलेगाव पागा - नागरगाव (ता. शिरूर) व देलवडी, वाळकी, पारगाव (ता. दौड) येथील भीमा, मुळा-मुठा नदीच्या नदी पात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. त्यामुळे डासांचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. ही जलपर्णी काढण्याची मागणी येथील स्थानिक रहिवासांनी केली आहे.

शिरूर - दौड तालुक्‍यातून वाहणाऱ्या भीमा, मुळा- मुठा नदीला  जलपर्णीचा विळखा पडला आहे. रांजणगाव सांडस,आलेगाव पागा, नागरगाव, वडगाव रासाई, साद्‌लगाव (ता. शिरूर) व देलवडी, वाळकी, पारगाव, नानगाव, (ता. दौड) आदी गावासह भीमा व मुळा- मुठा नदीकाठीवरील लोकांचे आरोग्य आणि जलचरांचे आसित्व धोक्‍यात आले आहे. शेतीला पाणी मिळावे म्हणून जलसंपदा विभागाने ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बाधले आहे.

त्यामुळे पाण्याचा प्रवाह संथ राहतो. त्यामुळे सर्वच ठिकाणी जलपर्णी जागीच तरगुंन राहत आसल्याने नदी पात्रात पाण्याचा प्रवाह पूर्णपणे जलपर्णीने वेढलेला दिसतो. त्यामुळे भीमेचे पावित्र्य धोक्‍यात येण्याचा संभव आहे. 
त्यामुळे नदी की हिरवेगार मैदान, असा प्रश्न पाहता क्षणी पडतो. अनेक वर्षांपासून लाखो मासे मृत्युमुखी पडत आहे. परिणामी, या भीमा आणि मुळा-मुठा नदी काठी गावामध्ये अधिकच दुर्गंधी पसरून या दोन्ही नदी काठावरील गावांना डासाचा पादुर्भाव जाणवतो.  

भीमा व मुळा- मुठा नदीच्या पाण्याचा वापर करणाऱ्या नदीकाठच्या गावातील लोकांचे व जलचराचे आरोग्य जलप्रदूषणामुळे धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने जलपर्णी हटवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बबनदादा रणदिवे, वसुकाका रणदिवे, मालू शिंदे, सुरेश रणदिवे, दशरथ रणदिवे, निखिल तांबे, रांजणगावचे सरपंच उत्तर लोखंडे, प्रभाकर रणदिवे, राजेंद्र शिंदे, अरुण भोसले, राजेंद्र शेलार आदींनी केली आहे.

Web Title: Bhima River Jalparni