दौंडमध्ये भीमेवर नवीन पूल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

दौंड - शहरातून जाणाऱ्या नगर-दौंड-कुरकुंभ-बारामती-फलटण या राष्ट्रीय महामार्गासाठी भीमा नदीवर ५२.४९ फूट रुंदीचा आणि १२७६ फूट लांबीचा नवीन पूल उभारला जाणार आहे. सध्याच्या मार्गाचे रुंदीकरण करीत महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी दौंड तालुक्‍यातील गोपाळवाडी, लिंगाळी, कुरकुंभ व जिरेगाव हद्दीतील एकूण १ लाख ३६ हजार ४७५ चौरस मीटर जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने मनमाड- नगर- दौंड- बारामती- फलटण- दहिवडी- विटा- तासगाव- काकडवाडी- सुभाषनगर- चिकोडी- बेळगाव हा राष्ट्रीय महामार्ग विकसित केला जात आहे. त्याअंतर्गत नगर- दौंड- कुरकुंभ- बारामती- फलटण या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व चौपदरीकरण केले जात असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याचे कंत्राट घेतलेले आहे. नगर ते काष्टी (ता. श्रीगोंदे, जि. नगर) दरम्यान जमिनीच्या उपलब्धतेनुसार सध्या रुंदीकरण आणि चार पदरी काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. महामार्गाच्या पुणे जिल्ह्यातील कामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात दौंड ते जिरेगावदरम्यान महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींच्या संपादनाची अधिसूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यानुसार गोपाळवाडी, लिंगाळी, कुरकुंभ व जिरेगाव हद्दीतील एकूण १ लाख ३६ हजार ४७५ चौरस मीटर जमीन संपादित केले जाणार आहे. खासगी शेतजमिनींसह वन जमिनी, गावठाणाचा भाग, रस्ते, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काही क्षेत्र याकरिता संपादित केले जाणार आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता सुहास देशपांडे यांनी सांगितले, ‘‘नगर व पुणे जिल्ह्यांना जोडणारा भीमा नदीवरील निमगाव खलू (ता. श्रीगोंदे, जि. नगर) ते सोनवडी (ता. दौंड) हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अपुरा पडत असल्याने त्याच्या बाजूला ५२.४९ फूट रुंदीचा आणि १२७६ फूट लांबीचा नवीन पूल उभारला जाणार आहे.’

Web Title: bhima river overbridge