भीमाशंकरला तीन लाख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

मंचर : "भीमाशंकर मंदिरातील दानपेटीत शुक्रवारी तीन लाख 26 हजार रुपये रोख रक्कम मिळाली. ही रक्कम भारतीय स्टेट बॅंकेच्या राजगुरुनगर शाखेत जमा केली आहे.'' अशी माहिती भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्‍वस्त खेड तालुक्‍याचे तहसीलदार सुनील जोशी यांनी दिली.

ते म्हणाले "मंदिर विश्‍वस्तांच्या समक्ष आज दानपेटी उघडण्यात आली. या वेळी योगायोगाने भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व खेड तालुक्‍याचे प्रांत अधिकारी सुनील गाडे मंदिरात आले होते.

त्यांना या रकमेची माहिती दिली आहे. जुन्या एक हजार रुपयांच्या तीन व 500 रुपयांच्या 38 नोटा, तसेच नवीन 500 रुपयांच्या वीस व दोन हजार रुपयांच्या 25 नोटा दानपेटीत मिळाल्या आहेत.

Web Title: bhimashankar deposits 3 lac