भीमाशंकर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी १४ केंद्रावर मतदान

एकूण २१ जागांपैकी एकूण १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले तर शिंगवे – रांजणी गटात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने तीन जागांसाठी निवडणूक होत आहे
Bhimashankar sugar factory election Voting at 14 centres on sunday 17 july 2022 Ambegaon
Bhimashankar sugar factory election Voting at 14 centres on sunday 17 july 2022 Ambegaonesakal

पारगाव : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिंगवे – रांजणी गटात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होत असून रविवार (दि १७) रोजी मतदान आहे मतदानासाठी एकूण १४ मतदान केंद्राची व्यवस्था केली असून एकूण ११ हजार ७११ सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहे. एकूण २१ जागांपैकी एकूण १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले तर शिंगवे – रांजणी गटात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने तीन जागांसाठी निवडणूक होत आहे रविवारी सकाळी सात ते पाच पर्यंत मतदान होणार असुन मतमोजणी मंगळवार दि.१९ रोजी सकाळी आठ वाजता क्रीडा संकुल (मंचर) येथे होणार आहे.

मतदान केंद्र, नाव पुढील प्रमाणे कंसात समाविष्ट गावे निरगुडसर - जिल्हा परिषद शाळा (निरगुडसर, बेलसरवाडी, जारकरवाडी, मेंगडेवाडी), पारगाव - जिल्हा परिषद शाळा (पारगाव, पोंदेवाडी, काठापूर बुद्रुक, देवगाव, लाखणगाव), लोणी- जिल्हा परिषद शाळा(लोणी, धामणी, खडकवाडी, वाळुंजनगर, वडगावपीर, रानमळा, मांदळेवाडी, पहाडदरा, शिरदाळे), रांजणी- जिल्हा परिषद शाळा (रांजणी, जाधववाडी, थोरांदळे, वळती, नागापूर), भराडी- जिल्हा परिषद शाळा(जवळे, भराडी, खडकी, चांडोली बुद्रुक , शिगवे, भागडी), अवसरी खुर्द - जिल्हा परिषद शाळा( अवसरी खुर्द, शिंदेमळा, भोरवाडी, खडकमळा, तांबडेमळा, वायळमळा, पिंपळगाव, चांडोली खुर्द, पेठ – वाकेश्वर विद्यालय( पेठ, पारगाव, कुदळेवाडी, कारेगाव), अवसरी बुद्रुक - जिल्हा परिषद शाळा( अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, गावडेवाडी), मंचर - जिल्हा परिषद शाळा (मंचर, वाळुंजवाडी, शेवाळवाडी, लांडेवाडी, वडगाव काशिंबेग, निघोटवाडी, चिंचोडी), कळंब- जिल्हा परिषद शाळा(कळंब, सुलतानपुर, नांदुर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, एकलहरे, लौकी)

महाळुंगे पडवळ - जिल्हा परिषद शाळा (महाळुंगे पडवळ, साकोरे), घोडेगाव – जनता विद्या मंदिर खोली क्रमांक- १ (घोडेगाव, काळेवाडी, धोंडमाळ, शिंदेवाडी, नारोडी, कोटमदरा, पिंपळगाव(घोडे), पिंगळेवाडी, अमोंडी, तळेकरवाडी (साल), ढाकाळे, आंबेदरा, गावरवाडी, साल, घुलेवाडी), घोडेगाव – जनता विद्या मंदिर खोली क्रमांक- २ (चास, चिंचोली(कोकणे), गोनवडी, कोलदरा, गिरवली, कडेवाडी,कळंबई, कुरवंडी, थुगाव, भावडी, कोल्हारवाडी), शिनोली - जिल्हा परिषद शाळा( गंगापूर खुर्द, गंगापूर बुद्रुक, शिनोली, कानसे, आपटी, फदालेवाडी, उगलेवाडी, डिंभे खुर्द, डिंभे बुद्रुक, आघाणे, आहुपे, , गोहे खुर्द, गोहे बुद्रुक, जांभोरी, चिखली, फुलवडे, पिंपरगणे, पिंपरी, पोखरी, नांदुरकीची वाडी, न्हावेड, नानवडे, दिगद, तळेघर, तिरपाड, डोण, मापोली, माळीण, बोरघर, फलोदे, साकेरी, सावरली, सुपेधर, वचपे, राजेवाडी, राजपूर, भीमाशंकर, महाळुंगे श्रीराम, कोंढरे, कुशिरे खुर्द, कुशिरे बुद्रुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com