

Monsoon Disrupts Bhimashankar Darshan as Temple Premises Get Flooded
esakal
भीमाशंकर: श्री क्षेत्र भीमाशंकर (ता. खेड) येथे सोमवारी (ता. ६) दिवसभर झालेल्या मुसळधार पावसानंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मंदिराला अक्षरशः पावसाच्या पाण्याचा वेढा पडला. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.