उत्तम कांबळे यांना ‘भीमथडी सन्मान’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

दौंड - ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना यंदाचा ‘भीमथडी सन्मान’ जाहीर झाला आहे. युवा पत्रकार हलिमाबी कुरेशी यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती दौंडमधील रचना संस्थेचे कार्यकारी प्रमुख राज काझी यांनी दिली. रविवारी (ता. २) दौंडमध्ये हा सोहळा आयोजित केला आहे. 

दौंड शहरातील स्वातंत्र्यसैनिक किसनदास कटारिया यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय किसनदास कटारिया चॅरिटेबल ट्रस्ट व रचना संस्थेतर्फे ‘भीमथडी सन्मान’ दिला जातो. ‘सामाजिक पत्रकारिता’ या विशेष कार्यक्षेत्रातील कामगिरीसाठी हा सन्मान कांबळे यांना दिला जात आहे. हलिमाबी कुरेशी यांना या वर्षी विशेष सन्मानाने गौरविले जाणार आहे. भीमथडी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी डॉ. जब्बार पटेल आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, आमदार राहुल कुल उपस्थित राहणार आहेत.

Web Title: bhimthadi honor for uttam kamble