Pune News : पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी; भोंगवली सबस्टेशनविरोधात कापूरहोळमध्ये रास्ता रोको, ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह ग्रामस्थ रस्त्यावर

Kapurhol Rasta Roko : भोर तालुक्यातील प्रस्तावित भोंगवली सबस्टेशन आणि ७६५ केव्ही टॉवर लाईनविरोधात आज कापूरहोळ येथे रास्ता रोको आंदोलन होत आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Kapurhol Rasta Roko

 Kapurhol Rasta Roko

esakal

Updated on

भोर तालुक्यातील प्रस्तावित भोंगवली सबस्टेशन आणि ७६५ केव्ही टॉवर लाईनविरोधात आज पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात बाधित ग्रामस्थ ट्रॅक्टर, बैलगाड्या तसेच जनावरांसह सहभागी झाल्याने महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी शक्यतो पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com