भोर शहर उद्यापासून पुढील आठ दिवसासाठी पुन्हा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

भोर शहरात शुक्रवारी (ता. १८) झालेल्या मेगा सर्वेक्षणात ४१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे तालुका प्रशासनाने भोर शहर सोमवारपासून (ता. २१) पुढील आठ दिवस (ता. २७ सप्टेंबरपर्यंत) पुन्हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. यापूर्वी १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना, व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना काही प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

भोर - शहरात शुक्रवारी (ता. १८) झालेल्या मेगा सर्वेक्षणात ४१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे तालुका प्रशासनाने भोर शहर सोमवारपासून (ता. २१) पुढील आठ दिवस (ता. २७ सप्टेंबरपर्यंत) पुन्हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. यापूर्वी १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना, व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना काही प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोर शहरात सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीस ३९ ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन होते. त्यामुळे संपूर्ण शहर आठ दिवस प्रतिबंधित क्षेत्र केले होते. या कालावधीत केवळ वैद्यकीय सुविधा वगळता इतर सर्व सुविधा बंद होत्या. त्यामुळे सर्व परिस्थिती जैसे थे राहणार आहे. शुक्रवारी ४१ जण कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्राच्या कालावधीत वाढ करण्याचा अहवाल तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला. त्यानुसार प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी भोर शहर २७ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्याचे आदेश दिले. 

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षावर शिवसेनेच्या गटनेत्याचे गंभीर आरोप 

प्रतिबंधित क्षेत्राच्या कालावधीत शहराच्या हद्दीतील परंतु एका टोकाला असलेले काही दुकानदार व व्यावसायीक आपली दुकाने उघडी ठेवत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhor city declared a restricted area again for the next eight days from tomorrow