Bhor News : 'भावाला सांगा कोणत्याही मुलीची टिंगल करू नकोस' दामिनी पथकामार्फत युवतींना मार्गदर्शन

प्रत्येक मुलीने आपल्या भावाला जर सांगितले की कुठल्याही मुलीच्या नादाला लागू नकोस आणि कोणत्याही मुलीची टिंगल करू नकोस तर ब-याच प्रमाणात गुन्हे कमी होतील.
Police Officer Rekha Wani
Police Officer Rekha WaniSakal

भोर - प्रत्येक मुलीने आपल्या भावाला जर सांगितले की कुठल्याही मुलीच्या नादाला लागू नकोस आणि कोणत्याही मुलीची टिंगल करू नकोस तर ब-याच प्रमाणात गुन्हे कमी होतील, असे मत भोरच्या परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक रेखा वाणी यांनी व्यक्त केले. येथील राजा रघुनाथराव कनिष्ठ विद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

गुरुवारी (ता.२४) दुपारी विद्यालयाच्या सभागृहात पोलिसांच्या दामिनी पथकामार्फत महाविद्यालयीन युवतींना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे, भोर एज्युकेशन सोसायटीचे सचिव गजानन झगडे, संचालक डॉ सुरेश गोरेगावकर, मधूकर पैठणकर, मुख्याध्यापक संजय कडूस, उपमुख्याध्यापक विष्णू अवघडे, सुपरवायझर सुरेश देशमाने, निलिमा मोरे आदींसह शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

रेखा वाणी म्हणाल्या, प्रत्येक मुलीने मोठी स्वप्न बघून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा. आणि आपल्यावर अन्याय होऊ न देण्यासाठी स्वतःला कणखर बनवाने. एसटी स्टँडवर आणि गाडीमध्ये तरुणांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितल्यानंतर रोखा वाणी यांनी टिंगलखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली असल्याचे सांगितले.

पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे यांनी मुलींना अत्यावश्यक सेवेसाठी ११२ क्रमांकाचा वापर करण्याचे सांगितले. जसा आपण इतर मुलांचा त्रास सहन करत नाही. त्या प्रकारे आपल्या भावालाही इतर मुलींना त्रास देवू नकोस असे सांगावे. विद्यालयात मुलींसाठी तक्रार पेटी ठेवण्याची सूचना त्यांनी विद्यालयास केली. मुलीना आणि इतर महिलांनाच्या तक्रारींची दखल पोलिसांकडून घेतलीच जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डॉ. सुरेश गोरेगावकर यांनी टिंगलखोरांनी त्रास दिल्यानंतर आंदोलन करण्यापेक्षा त्रासाच्या देण्याच्या वेळीस योग्य प्रतिकार करण्याचे आवाहन मुलींना केले. अत्याच्यारानंतरच्या त्रासापेक्षा यावेळी राजा रघुनाथराव विद्यालयातील विद्यार्थिनीनी पोलिसांकरीता तयार केलेल्या राख्या पोलिस उपअधीक्षक रेखा वाणी यांच्याकडे सुपूर्त केल्या. स्वाती दुधगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर वासंती वाघ यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com