esakal | भोर- महाड मार्ग मंगळवारपासून बंद

बोलून बातमी शोधा

Varandha-Ghat}

भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात अतिवृष्टीमुळे पडलेल्या दरडी आणि संरक्षण भिंतींचे काम पूर्ण करण्यासाठी मंगळवारपासून (ता. १०) ते ३० एप्रिल पर्यंत सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे.

भोर- महाड मार्ग मंगळवारपासून बंद
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भोर - भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात अतिवृष्टीमुळे पडलेल्या दरडी आणि संरक्षण भिंतींचे काम पूर्ण करण्यासाठी मंगळवारपासून (ता. १०) ते ३० एप्रिल पर्यंत सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे.

पुणेकरांनो ऐकलंत का? 10 महिन्यांनी कोरोनाबाबत पहिल्यांदाच मोठी बातमी

मागील वर्षी १३ ऑगष्टला अतिवृष्टीमुळे घाटातील रस्त्यांवर दरडी कोसळल्या आणि संरक्षण भिंतीही पडल्या गेल्या. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. घाटातील भोर बाजूकडील रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे दुचाकी व चारचाकी गाड्या जाऊ लागल्या. परंतु एस.टी. व इतर सार्वजनिक वाहने अद्यापही बंद आहेत. शासनाकडून घाटातील महाडच्या हद्दीतील रस्त्याचे आणि संरक्षण भिंतीचे काम करण्यासाठी ५ कोटी ४० लाख ५५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे मंगळवारपासून येथील काम सुरू करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्यंटनाचा घ्या आनंद
भोर बाजूकडून वरंधा घाटातील घाटमाथ्यावरील  वाघजाई मंदिरापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहने वाघजाई मंदिरापर्यंत जाऊ शकतात. परंतु तेथून पुढे महाडकडे पर्यटकांना जाता येणार नाही, त्यांना पुन्हा माघारी भोरला यावे लागणार आहे. मात्र, पर्यटकांना घाटातील पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.

अपघातग्रस्त महिलेला ओळखताय का? पोलिसांना कळवा; मदतीचं आवाहन

घाटातील रस्ता हा सह्याद्रीच्या अतीदुर्गम पर्वतरांगांमध्ये एकावर एक अशा तीन मोठ्या वळणाचा आहे. त्यामुळे तेथील संरक्षण भिंतींचे बांधकाम मोठ्या उंचीचे करावे लागणार आहे. याशिवाय जेसीबी, पोकलॅंड, डंपर, मिस्कर ठेवण्यासाठी आणि खडी, डबर, वाळू, सिमेंट, प्लेटस् व लोखंडी अॅंगल ठेवण्यासाठी जागा अपुरी आहे. यासाठी पुढील ८० दिवस हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
- रत्नाकर बामणे, कार्यकारी अभियंत्या, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड

Edited By - Prashant Patil