भोसरीत तरूणाची आत्महत्या

संदीप घिसे 
शनिवार, 5 मे 2018

पिंपरी- राहत्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.४)रात्री भोसरी येथे घडली.

रितेश शिवाजी लांडे (वय २०, रा.लांडेवाडी, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश यांच्या मावस बहिणीच्या  विवाह सोहळ्यासाठी घरातील सर्वजण गेले होते. घरी रितेश एकटाच होता. रात्री अकराच्या सुमारास त्याने छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यास त्वरित वायसीएम रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Bhosari one commit suicide

टॅग्स