भोसरीतील कोंडीमुळे वाहनचालक बेजार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

काय करता येईल

  • चांदणी चौक, भोसरी-दिघी रस्ता चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी
  • भोसरी-दिघी चौकातून भोसरी-आळंदी चौकातून यू टर्न घ्यायला लावणे
  • आळंदी रस्ता, दिघी रस्ता चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करावेत
  • सेवा रस्त्यावरील खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई करावी

भोसरी - येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवारस्त्यावर दररोज सायंकाळी वाहनांची कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांमधून संताप व्यक्त केला आहे. ही कोंडी दूर करण्याबरोबरच बेशिस्त वाहनचालक, अतिक्रमण, पथारीवाले, हातगाडीवाले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भोसरीतील सेवारस्त्यावर दररोजी सायंकाळी भोसरी- आळंदी रस्ता चौक, पीएमटी चौक आदी भागांत खासगी प्रवासी वाहने थांबलेली असतात. तसेच, हातगाडीवाले व पथारीवाल्यांचे अतिक्रमणही असते. राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील चांदणी चौकात आळंदी रस्ता आणि दिघी रस्त्यावरून येणारी वाहने पीसीएमसी चौकाकडे वळतात. या चौकातून वाहने पुढे आळंदी रस्ता आणि मोशी मार्गाकडे जातात. दिघी रस्त्याने वाहनांची गर्दी असते. याच चौकातून पीएमटी चौकाकडे तसेच दिघी रस्त्याकडे वळणाऱ्या वाहनांमुळे चौकात वाहतूक कोंडी होते. बसथांब्याच्या जागेत खासगी वाहने थांबविली जातात, त्यामुळे बसला वळण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळेही वाहतूक कोंडी होते. बीआरटी टर्मिनल चौकातील पाच पदरी रस्त्यापैकी एक पदरी भाग बीआरटीएस बस टर्मिनलने, एकपदरी भागात पीएमपीएमएल बसथांबा, तसेच एकपदरी भाग खासगी प्रवासी वाहनांनी व्यापतो, त्यामुळे इतर वाहनांसाठी एकपदरी भागच शिल्लक राहतो. हा भागही काही वेळा खासगी प्रवासी वाहनांनी व्यापलेला असतो. याविषयी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाशी संपर्क होऊ शकला नाही.

घरगुती वादातून महिलेने प्यायले विष; पोलिसांमुळे वाचला जीव

भोसरी वाहतूक शाखेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. इंद्रायणी थडी संपल्यानंतर भोसरीतील वाहतुकीचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. सेवा रस्त्याच्या कडेला झालेल्या विविध विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळेही वाहतूक कोंडीत भर पडते.
- शिवाजी गवारे, पोलिस निरीक्षक, भोसरी वाहतूक विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhosari traffic issue