तिबेटमधून आलेल्या पुराचा १० तासांचा प्रवास;

तिबेटमधून आलेल्या पुराचा १० तासांचा प्रवास;
Published on: 

भोटेकोशी ते नारायणी
तिबेटमधून आलेल्या महापूराचा प्रवास
नवी दिल्ली/काठमांडू, ता. २७ (वृत्तसंस्था): नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी आलेल्या भीषण भोटेकोशी पूराचा उगम तिबेटमध्ये झालेल्या प्रचंड लाटेतून झाला असल्याचे प्राथमिक तांत्रिक अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर भोटेकोशी, त्रिशूलीमार्गे मुग्लिन, मालेखू आणि देवघाट ओलांडत हा पूर नारायणी नदीपर्यंत पोचला. सुमारे दहा तासांच्या या प्रवासात नदीकाठच्या अनेक भागांना मोठा फटका बसला. प्रशासनाने धोक्याची पूर्वसूचना देण्यासाठी सहा लाखांहून अधिक एसएमएस पाठविले.
नेपाळच्या पूर अंदाज विभागाच्या तांत्रिक अहवालानुसार, सकाळी ८.३७ वाजता ४.४ तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला. त्यानंतर ८.५० वाजता रसुवा येथील स्याब्रुबेसी पाणीपातळी मापन केंद्राचा संपर्क तुटला. त्यावेळी नदीची पातळी १.६२ मीटर होती.
सकाळी ९.०५ वाजता तिबेटच्या बाजूकडून मोठा पूर भोटेकोशी नदीत आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर रसुवा, नुवाकोट, धादिंग आणि चितवन जिल्ह्यांतील नागरिकांना सजग करण्यात आले. ९.१५ ते ९.१६ या वेळेत सहा लाखांहून अधिक एसएमएस पाठविण्यात आले.
९.२० वाजता बेत्रावती येथील पाणीमापन केंद्राचाही संपर्क तुटला. पुराचा वेग लक्षात घेऊन त्रिशूली नदीकाठच्या वस्त्या, पृथ्वी महामार्ग आणि मुग्लिन-नारायणघाट मार्गावरील नागरिकांना इशारे देण्यात आले.
१०.२८ वाजता पूर धादिंग-गल्छी परिसराकडे सरकत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर ११.२६ वाजता फुर्के येथील नदीपातळी धोक्याच्या मर्यादेपेक्षा वर गेली. अवघ्या १७ मिनिटांत, म्हणजे ११.४३ वाजता, पुराच्या लोंढ्याने फुर्के नदीवरील पूल आणि अन्य संरचना वाहून नेल्या.
११.५० वाजता पुराचे पाणी मालेखू येथे पोहोचले. दुपारी एक वाजता महापूर मुग्लिन ओलांडल्याची माहिती मिळाली. देवघाटपर्यंतच्या नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला. १.३० वाजता देवघाट येथे पाणीपातळी ४.७६ मीटर झाली.
२.१४ वाजता कालिखोला येथे नदीची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा वर गेली आणि ती १२.३ मीटरवर पोहोचली. ३.२० वाजता पूर नारायणी-देवघाट परिसरात पोहोचला. सायंकाळी चार वाजता देवघाट येथे पाणीपातळी ६.५७ मीटर या उच्चांकावर गेली. त्यानंतर पाणी ओसरू लागले.
सायंकाळी ६.३० वाजता देवघाट येथील पाणीपातळी सुमारे चार मीटरवर आली. प्राथमिक अंदाजानुसार या पुरामुळे नदीप्रवाहात सुमारे दोन कोटी घनमीटर अतिरिक्त पाणी आले.
भोटेकोशी पुराचा घटनाक्रम
स. ८.३७: ४.४ तीव्रतेचा भूकंप
९.०५ : तिबेटकडून मोठा पूर भोटेकोशीत दाखल
९.१५ ते ९.१६ : चार जिल्ह्यांत सहा लाखांहून अधिक एसएमएस
९.२०: बेत्रावती पाणीमापन केंद्राचा संपर्क तुटला
१०.२८ : धादिंग-गल्छी, मुग्लिनसाठी इशारे
११.४३ : फुर्के पूल आणि अन्य संरचना वाहून गेल्या
११.५० : महापूर मालेखूत पोहोचला
दु. १.०० : महापूराने मुग्लिन ओलांडले
२.१४, ४.०० : कालिखोला १२.३ मीटर; देवघाट ६.५७ मीटर
६.३० : देवघाटला पाणी चार मीटरवर; पूराचा जोर ओसरला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gandaki River Flood Triggers Evacuations Across Nepal
Nepal Flood Crisis: Massive Destruction and Rising Death Toll
Nepal flood unidentified bodies DNA samples
An 11-year-old boy searches for his father who went missing after being swept away in the Nepal floods
Marathi News Esakal
www.esakal.com