

NEET 2026 Bhumika Rathod Turns Adversity Into Success Secures MBBS Admission After Overcoming Physical Challenges
sakal
पुणे : शाळेत पाठीच्या कण्यातील व्यंगावरून होणारी चेष्टा आणि बसणे-उठणेही अवघड करणारा गंभीर आजार... मात्र संकटांसमोर न झुकता छत्रपती संभाजीनगरच्या एलन करिअर इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी भूमिका राठोड हिने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ‘नीट-यूजी २०२६’ परीक्षेत यश संपादन केले. शारीरिक दिव्यांग प्रवर्गात देशात २१५७ वा क्रमांक पटकावत तिने पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश निश्चित केला आहे.