पुणे : मार्केट यार्डमधील भुसार बाजाराबाबत झाला निर्णय; केव्हा सुरू होणार, वाचा सविस्तर

mar.jpgmar.jpg
mar.jpgmar.jpg
Updated on

मार्केट यार्ड : बाजारातील व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने भुसार विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सोमवारी पणन संचालकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बाजार समिती प्रशासन आणि व्यापाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. दि पूना मर्चंट्स चेंबर कार्यकारिणीची बैठक घेऊन लवकर निर्णय जाहीर करणार आहेत. त्यानुसार पुढील दोन-तीन दिवसांत भुसार विभाग सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

भुसार बाजारातील काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर दी पूना मर्चंट्स चेंबरने मंगळवार (ता. १९) पासून पुढील अनिश्चित काळासाठी गूळ-भुसार विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पणन संचालक सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख, दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, सचिव विजय मुथा, राजेंद्र बाठीया यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बी. जे. देशमुख म्हणाले, कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मंगळावर (ता.१९) पासून भुसार बाजाराचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. बाजारात येणाऱ्या सर्वांचे शरीररातील तापमान तपासण्यासाठी थर्मल गण उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, परवानाधारकांनाच बाजारात प्रवेश दिला जाणार आहे.धान्य-किराणा माल हा नाशवंत नाही. त्यामुळे दोन-तीन दिवस भुसार बाजार बंद राहिल्याने मालाचा तुटवडा जाणवणार नाही.

मंगळवारी (ता.१९) चेंबरच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून बाजार सुरू ठेवायचा की बंद ठेवायचा याबाबत निर्णय केला जाणार आहे. -पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com