मार्केट यार्डातील 'हा' विभाग होणार बंद; पोलिसांच्या सहकार्याची मागणी

Pune-Market-Yard
Pune-Market-Yard

मार्केट यार्ड : गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार विभाग सोमवारपासून (ता. १३) बंद राहणार आहे. याचा मोठा परिणाम शहरातील अन्न धान्याच्या तुटवड्यावर होणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. आधीच शहरातील किराणा दुकानात मालाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. त्यात पुन्हा मार्केट यार्ड बंद झाल्याने यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. 

फळ, भाजीपाला विभागानंतर भुसार विभागही बंद झाल्याने मार्केट यार्डातील सर्व विभाग सोमवारपासून बंद होणार आहेत. बाजारात शहराच्या विविध भागातून कामगार येतात. त्यासाठी बाजार समितीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या सहीने कामगारांना ओळखपत्र दिली आहेत. परंतु ओळखपत्र दाखविल्यावर पोलीस सोडत नाहीत. उलट हे फाडून टाकण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

तसेच कामगारांना मारहाण देखील होत आहे. पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने सोमवारपासून भुसार बाजार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दि पूना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला, कांदा, बटाटा आणि केळी विभाग शुक्रवारपासून बंद झाला आहे. तरीही भुसार विभाग सुरू राहणार असल्याचे गुरुवारी ओस्तवाल यांनी सांगितले होते.

ओस्तवाल म्हणाले, शहरातील नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धान्य मिळावे म्हणून आम्ही निर्माण झालेल्या परिस्थितीत बाजार चालवत आहोत. मात्र, पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भुसार बाजार बंदबाबत पत्र मिळाले असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com