Bhutya
Bhutya

भूत्याबाबा परंपरा जोपासण्यासाठी "एक कदम'

सातगाव पठार (पुणे) : मराठी लोकसंस्कृतीचा एक प्राचीन आविष्कार भूत्याबाबाच्या रूपाने ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. मात्र, जागतिकीकरणाच्या रेट्यापुढे अनेक परंपरा आणि लोकसंस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर असतानाच तुळजापूर येथील सुरेश गणपतराव कदम यांनी आपली वाडवडीलांपासून चालत आलेली भूत्याबाबाची परंपरा आजही कायम ठेवली आहे.

पेठ (ता. आंबेगाव) येथे दरवर्षी दिवाळीनंतर तुळजापूर येथून सुरेश गणपतराव कदम हे भूत्याबाबा येत असतात. याही वर्षी त्यांनी नेहमीप्रमाणे हजेरी लावली. लोककला माहीत असणारी मोजकीच मंडळी आता शिल्लक आहेत. या लोककला, लोकसंस्कृती काळाच्या ओघात नष्ट होत चालल्या आहेत. गावागावात देखील आता सिमेंटची जंगले उभी राहू लागली आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे गावात देखील म्हणावी अशी दक्षिणा आणि धान्य मिळत नाही. मात्र, आमच्या घराण्याची ही परंपरा वाडवडिलांपासून चालत आलेली आहे. त्यामुळे मी ती आजही तेवढ्याच श्रद्धेने परंपरा जोपासत असल्याचे कदम यांनी सांगितले.

गेली 100 ते 150 वर्षांपासून कदम यांच्या कुटुंबामध्ये ही लोककला जोपासली जात आहे. हे भूत्याबाबा तुळजापूर जवळील कदमाचीवाडी येथील रहिवासी आहेत. पेठमध्ये महिनाभर त्यांचा मुक्‍काम दत्तात्रेय क्षीरसागर यांच्या घरी असतो. हे बाबा प्रामुख्याने घटस्थापनेनंतर येतात. यांच्याकडे वरुडे, वाफगाव, पेठ, गुळाणी, जऊळके, पारगाव आदी ठिकाणी ते लोककला सादर करतात. भूत्या हा देवीचा भक्‍त असून छातीवर देवीचा भला मोठा टाक, हातात पेटता पोत, असा पेहराव घालून हा भूत्याबाबा देवीची गाणी गात, नाचत असतो, अशी आख्यायिका असून त्याचपद्धतीने कदम गात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com