साडेपाच हजार मुलींना सायकली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे - जिल्ह्यातील पाच हजार ३८० विद्यार्थिनींना सायकली मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी दोन कोटी ४२ लाख १० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याबाबतच्या तालुकानिहाय याद्याही संबंधित पंचायत समित्यांना पाठविण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींना आता पसंतीची सायकल खरेदी करण्याची मुभा असणार आहे. 

पुणे - जिल्ह्यातील पाच हजार ३८० विद्यार्थिनींना सायकली मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी दोन कोटी ४२ लाख १० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याबाबतच्या तालुकानिहाय याद्याही संबंधित पंचायत समित्यांना पाठविण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींना आता पसंतीची सायकल खरेदी करण्याची मुभा असणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, सायकल खरेदीची पावती संबंधित पंचायत समितीकडे सादर करावी लागणार आहे. सायकल खरेदीसाठीची प्रत्येकी साडेचार हजार रुपयांची रक्कम थेट लाभार्थी मुलींच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर जिल्हा परिषदेकडून विद्यार्थिनींना सायकली मिळणार आहेत. या सायकली इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनींसाठी असणार आहेत, असे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके यांनी आज सांगितले. 

दरम्यान, एकाच वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकलींचे वाटप करण्यात आल्याने, गेल्या दोन वर्षांत जिल्हा परिषदेकडून एकही सायकल वाटप करण्यात आली नव्हती. यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर सुमारे साडेपाच हजार सायकलींचे वाटप करण्यात येत आहे. मात्र सरसकट सायकल वाटप न करता गरजू विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांपैकी निकषांनुसार पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थिनींचे अर्ज मंजूर करण्यात आल्याचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी सांगितले. 

सायकल खरेदी करण्याची मुभा विद्यार्थिनींना देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या पसंतीनुसार दर्जेदार सायकल खरेदी करता येतील. सायकलींबाबतीत यंदा पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात येत आहे. जिल्हा परिषद केवळ सायकलींची प्रत्येकी साडेचार हजार रुपयांची किंमत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करेल. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 
- राणी शेळके,  महिला व बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद, पुणे  

... हा होता योजने मागचा हेतू 
जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रदीप कंद यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षात म्हणजेच २०१६ मध्ये एकाच वर्षात २७ हजार सायकलींचे वाटप केले होते. त्या वेळी इयत्ता पाचवीतील सर्वंच मुलींना सरसकट सायकली मंजूर केल्या होत्या. पाचवीच्या वर्गातील विद्यार्थिनींना सायकल दिल्यास, दहावी उत्तीर्ण होईपर्यंत संबंधित विद्यार्थिनीस सायकल वापरता येईल, असा त्यामागचा हेतू होता. 

Web Title: Bicycle for five thousand fifty hundred girls