पर्यावरण दिनानिमित्त सकाळ व इंडो-सायकलिस्ट क्लबतर्फे सायकल रॅली

ज्ञानेश्वर भंडारे
मंगळवार, 5 जून 2018

वाल्हेकरवाडी - सकाळची रम्य पहाट, मंद झुळझुळणारा वारा, पावसाची चाहूल आणि त्यात पर्यावरण प्रेमीचा उत्साह, नवतरुणांचा जल्लोष या सर्वाना निमित्त होते जागतिक पर्यावरण दिनाचे. पर्यावरण दिनानिमित्त रावेत येथे सकाळ माध्यम समूह व इंडो सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली रावेत येथील संत तुकाराम पूल, भोंडवे चौक, डांगे चौक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी, औंध, विद्यापीठ गेट मार्गे सकाळच्या मुख्य कार्यालयापर्यंत काढण्यात आली. 

यावेळी सकाळचे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, वितरण विभागाचे मुख्य व्यवस्थापक अब्दुल अझीज, जाहिरात विभागाचे व्यवस्थापक मिलिंद भुजबळ, वरिष्ठ व्यवस्थापक विनोद पाटील, सहाय्यक व्यवस्थापक सुनील फलफले, गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील, यतीश भट, वेंकटेश उपाध्याय, अभिजित लोंढे, अमित खारोटे उपस्थित होते. 

सकाळचे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर यावेळी बोलताना म्हणाले, पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल उपयोग करणे ही काळाची गरज बनली आहे. नागरिकांनी प्रदूषण विरहीत गोष्टीना प्राधान्य द्यावे यावेळी त्यांनी सकाळच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. इंडो-सायकलिस्ट क्लबच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक मार्गावर सायकल ट्रॅक विकसित करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bicycle rally by Sakal and Indo-Cyclist Club on Environment Day