समाजात घुबडांबद्दल प्रचंड गैरसमज : डॉ. डंकन

समाजात घुबडांबद्दल प्रचंड गैरसमज :  डॉ. डंकन

पुणे : "भारतीय समाजात घुबडाबद्दल प्रचंड गैरसमज असल्याने त्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. अशा स्थितीत घुबडांची संख्या वाढावी, ते सुरक्षित राहावेत यासाठीचे चिंतन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आल्याने त्यासाठी नक्कीच पूरक वातावरण निर्माण होईल,'' असा विश्‍वास 'जागतिक घुबड परिषदे'चे समन्वयक डॉ. जेम्स डंकन यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित चार दिवसीय आंतरराष्ट्रीय घुबड परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. त्यावेळी तेबोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, इस्रायलमधील प्रख्यात पक्षीतज्ञ डॉ. रुवेन योसेफ, प्राणिशास्त्र विभागाच्या डॉ. कल्पना पै, "इला फाउंडेशन'चे संचालक डॉ. सतीश पांडे उपस्थित होते. दरम्यान, विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहातील घुबडांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. करमळकर यांच्या उपस्थितीत झाले.

डॉ. करमळकर म्हणाले, "भारतीय संस्कृतीत मनुष्य निसर्गाचा मालक नसून तो एक भाग आहे. त्यामुळे निसर्ग-पर्यावरणाच्या संवर्धनाचे काम होणे आवश्‍यक आहे. या परिषदेत विद्यापीठ, सामाजिक संस्था, वन विभाग, अभ्यासक हे सहभागी झाल्याने यातून संवर्धन होण्यास मदत होईल.''

डॉ. काकोडकर म्हणाले, "महाराष्ट्राच्या पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये घुबडला महत्व प्राप्त करून देण्यासाठी वन विभागाकडून दुर्लक्षित घुबडांचा अभ्यास केला जाईल.' "भारतातील पर्यावरणाच्या अभ्यासात मी यापूर्वीही सहभाग घेतला आहे. त्यात आणखी वाढ केली जाईल, असे पक्षीतज्ज्ञ रूवेन योसेफ यांनी सांगितले.

सोळा देशातील अभ्यासक सहभागी

या परिषदेमध्ये 16 देशांमधील घुबडवर अभ्यास करणारे तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. आजच्या सत्रांमध्ये अभ्यासकांनी घुबडांवरील त्यांच्ये शोधनिबंध सादर केले. भारत आणि अन्य देशातील संस्कृतीमधील घुबड विषयक संकल्पना या सत्रात भारतीय संस्कृतीतील घुबड या विषयावर डॉ. सुरुची पांडे यांनी विचार मांडले. ऑस्ट्रियातील संशोधक इनग्रीड कोल, स्वीत्झरलॅंड मधील संशोधक ऍलेक्‍स राऊलींन यांनीही त्यांचे विचार मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com