esakal | डाळिंबाने मारले; पण दोडक्याने केला पैशांचा वर्षाव
sakal

बोलून बातमी शोधा

डाळिंबाने मारले; पण दोडक्याने केला पैशांचा वर्षाव

१५ गुंठ्यामध्ये घेतले ६ टनापेक्षा जास्त दोडक्याचे उत्पादन.

डाळिंबाने मारले; पण दोडक्याने केला पैशांचा वर्षाव

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील  ५४ फाट्याजवळील अशोक शिंदे या शेतकऱ्यांचे पावसामुळे ४ एकरातील डाळिंबाचे नुकसान झाले. मात्र १५ गुंठ्यातील दोडक्याने शेतकऱ्याला तारले असून साडेतीन महिन्यामध्येच मालामाल केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

५४ फाट्यावरील अशोेक तुकाराम शिंदे यांना ५ एकर शेती आहे. यातील ४ एकरामध्ये डाळिंब असून उर्वरित अर्धा एकरामध्ये इतर भाजीपाल्याची पिके  व अर्धा एकरामध्ये घर व गुरांचा गोठा आहे. चालू वर्षी इंदापूर तालुक्यामध्ये सरासरीच्या दुप्पटीपेक्षा जास्त पाउस झाला. शिंदे यांच्या शेताच्या परीसरामध्ये तर चालू वर्षीच्या पावसाळ्यामध्ये एक हजार मि.ली.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. अतिपावसामुळे शिंदे यांची २ एकरातील डाळिंबाच्या बागेचे शंभर टक्के नुकसान झाले.

तर उर्वरित दोन एकरातील डाळिंबाचा उत्पादन खर्च ही निघाला नाही. डाळिंब तोट्यामध्ये असल्याने शिंदे यांनी १५ गुंठ्यामध्ये मलचिंग पेपरवरती २१ ऑगस्ट दिवशी दोडक्याची लागवड केली. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये ही जोराचा पाउस झाला. मात्र  मलचिंग पेपरमुळे दोडक्याच्या शेतामध्ये पाणी साचले नाही.तसेच मुळ्यांची ही चांगली वाढ झाल्याने दोडक्याचे पीक जोमात आले.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी

दरम्यान, ४५ दिवसानंतर प्रत्यक्ष उत्पादनास सुरवात झाली. सुरवातीच्या आठ दिवसानंतर दोडक्याचे उत्पादनामध्ये वाढले.  दररोज  सरासरी १२५ किलो दोडक्याचे उत्पादन निघण्यास सुरवात झाली. पुण्यातील नामांकित मॉलला दोडका 
विक्रीसाठी पाठविल्यामुळे ५६ रुपये किलोचा उच्चांकी दर मिळाला. दोडक्याचा हंगाम संपत असताना शेवटच्या पंधरावड्यामध्ये उत्पादनामध्ये व दरामध्ये ही काही प्रमाणात घट झाली.

पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी

एक दिवसाआड सरासरी ९० ते ७० दोडक्याचे उत्पादन निघत होते. तसेच दर ही २५ रुपये किलोपर्यंत खाली आला होता. दोडक्याचे संपूर्ण हंगामामध्ये १५ गुंठ्यामध्ये सहा टनापेक्षा जास्त उत्पादन मिळाले असून  पावणे तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. दोडक्याची तोडणी,औषधफवारणीसाठी अशोक  शिंदे यांच्या पत्नी उज्वला यांनीही  मोलाची मदत केली. तसेच दत्तात्रेय शेंडे व मयूर खराडे यांनी उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन केले.

(संपादन : सागर डी. शेलार)