पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी 

पांडुरंग सरोदे
Tuesday, 1 December 2020

चंदननगर येथे चोरट्यांनी थेट दारु विक्रीच्या दुकानालाच लक्ष्य केले, तेथे चोरट्यांनी दारुच्या बाटल्यांची एक, दोन नव्हे तर तब्बल 32 खोकी चोरुन नेली, या दारुची किंमत 63 हजार इतकी आहे. 

पुणे ः चोरट्यांकडून सदनिका, बंगले, दुकानांमध्ये चोरी करण्याचे प्रकार सातत्याने घडतात. काही दिवसांपुर्वी तर चोरट्यांनी मेडीकल, दवाखान्यांमध्येही चोरी केल्याच्या घटना घडल्या. परंतु चंदननगर येथे चोरट्यांनी थेट दारु विक्रीच्या दुकानालाच लक्ष्य केले, तेथे चोरट्यांनी दारुच्या बाटल्यांची एक, दोन नव्हे तर तब्बल 32 खोकी चोरुन नेली, या दारुची किंमत 63 हजार इतकी आहे. 

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शहरात लागू केलेले लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यानंतर शहरामध्ये चोरी, घरफोडीच्या घटना वाढू लागल्या. ऐरवी बंद सदनिका, बंगले, दुकाने अशा ठिकाणांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात होते. परंतु मागील काही महिन्यांपासून चोरट्यांकडून मेडीकल, दवाखाने, हॉटेल्स, शाळांची कार्यालयांमध्ये चोरी करण्याचे प्रकार घडले आहेत. बहुतांश ठिकाणी पैसे न मिळाल्यामुळे चोरट्यांकडून वस्तु चोरुन नेल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये पुढे आले. असे असताना दोन दिवसांपुर्वी चंदननगरमध्ये चोरट्यांनी एका दारु विक्रीच्या दुकानामध्येच चोरी केल्याचे उघड झाले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चंदननगर परिसरामध्ये देशी दारु विक्रीचे दुकान आहे. दोन दिवसांपुर्वी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दारुच्या दुकानाचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी दुकानातील 63 हजार रुपये किंमतीची दारुची तब्बल 32 खोकी चोरुन नेली. दुकानाचे मालक सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दुकानमालक बाळासाहेब माधव पुरी (वय 22) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves snatched 32 boxes of liquor bottles