Rickshaw Association : पुण्यातील रिक्षा संघटनेत मोठी फूट; बाबा कांबळेंना संघटनेतून वगळलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rickshaw Association

पुण्यातील रिक्षा संघटनेत (Rickshaw Association) फूट पडल्याची माहिती समोर येत आहे.

Rickshaw Association : पुण्यातील रिक्षा संघटनेत मोठी फूट; बाबा कांबळेंना संघटनेतून वगळलं!

पुणे : बाईक टॅक्सी सेवा बंद करा, ऑनलाइन सेवेतून बाईक टॅक्सी हटवा आणि कंपनीवर कारवाई करा आदी मागण्यांसाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (Pune Regional Transport Office RTO) इथं रिक्षाचालकांनी बेमुदत ठिय्या आंदोलन केलं होतं.

हे आंदोलन पोलिसांची परवानगी न घेता बेकायदा करण्यात आल्यानं ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष डाॅ. केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यासह 2300 ते 2500 रिक्षाचालकांवर बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. दरम्यान, आता पुण्यातील रिक्षा संघटनेत (Rickshaw Association) फूट पडल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा: Uddhav Thackeray : शिवशक्ती-भीमशक्तीसोबत लवकरच 'लहूशक्ती' दिसणार; काय म्हणाले उद्धव ठाकरे?

बाईक-टॅक्सीविरोधी आंदोलन समितीतून (Bike-Taxi Movement Committee) रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांची संघटना वगळ्यात आली आहे. जाणून-बुजून पत्रकारांसमोर वाद उकरून काढून आंदोलनात फूट पडेल असा प्रयत्न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळं 17 संघटनांऐवजी आता 16 संघटना आंदोलनात असणार आहेत.

हेही वाचा: Jharkhand : आता 15 वर्षांच्या मुस्लिम मुलीला आवडत्या मुलाशी करता येणार लग्न; High Court चा मोठा निर्णय

समितीनं एकमतानं ठराव करून बाबा कांबळे (Baba Kamble) यांना संघटनेतून वगळलं आहे, अशी माहिती बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली. दोनच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटून आल्यानंतर हा वाद झाला होता. तर, दुसऱ्या बाजूला बाबा कांबळे यांनी रिक्षा आंदोलनात बोगस रिक्षा संघटनांनी आंदोलनाला हिंसक वळण दिल्याचा आरोप केला आहे.