शिरवलीत दोन लाखांच्या रोकडसह ६० तोळे सोने केले लंपास

विजय जाधव
Thursday, 17 December 2020

शहराजवळील शिरवली (ता. भोर) येथील व्यापाऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दोन लाख रुपयांच्या रोख रकमेसह ६० तोळे चोरून नेले.

भोर : शहराजवळील शिरवली (ता. भोर) येथील व्यापाऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दोन लाख रुपयांच्या रोख रकमेसह ६० तोळे चोरून नेले. बुधवारी (ता.१६) रात्री साडेआठ ते गुरुवारी (ता.१७) सकाळी सहा या वेळेत ही घटना घडली. जनावरांच्या खरेदी-विक्रीचा व्यापार करणारे राजू आत्माराम पवार (वय ४६) यांच्या घरात ही चोरी झाली आहे.

डॉक्‍टर तरुणाला ३० लाख १० हजारांचा ऑनलाइन घातला गंडा

याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजू पवार हे बुधवारी रात्री साडेआठ वाजता पत्नीच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्यामुळे मुलांसह मुलीकडे राहावयास गेले. गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचा मुलगा घरी आल्यावर दवाजाचा कडीकोयंडा उघडलेला दिसला. त्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या 
लक्षात आले.

त्यांच्या कपाटाची तिजोरी फोडून चोरट्याने २ लाख रुपयांची रोकड आणि ६० तोळे सोने चोरून नेले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. पोलिसांनी ठसेतज्ञ व स्वानपथकास पाचारण करून तपासास सुरुवात केली आहे. पोलिस निरीक्षक राजू मोरे पुढील तपास करीत आहेत.

भेसळीचा संशय आल्याने तब्बल ९ लाखाचा तूप साठा जप्त   

*नागरिकांमध्ये भितीचे वातावरण- मागील चार दिवसात चोरीही ही दुसरी घटना असून रविवारी (ता. १३) चोरट्यांनी भोर शहरातील भरवस्ती असलेल्या श्रीपतीनगरमधील बंद घर फोडून अडीच लाख रुपयांची रोखड आणि पाच तोळे सोने चोरून 
नेले आहे. आता बुधवारी (ता. १६) पुन्हा चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चारच 
दिवसांत जबरी चोरी करून चोरट्यांनी थेट पोलिसांना आव्हान दिले आहे. यामुळे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A big theft in Shirwali