
वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी (एमडी) प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी करून दोघांनी हडपसर येथील एका डॉक्टर तरुणाला ३० लाख १० हजारांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे - वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी (एमडी) प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी करून दोघांनी हडपसर येथील एका डॉक्टर तरुणाला ३० लाख १० हजारांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सौरभ लांबतुरे (वय २६, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार संतोषकुमार आणि श्यामा सर ऊर्फ बाबूभाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तक्रारदार तरुणाने एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी एका वेबसाइटवर अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी एकाने सौरभ यांना फोन करून एमडीला प्रवेश मिळवून देण्याची बतावणी केली. त्यानुसार डॉक्टर आणि संबंधित फोन करणाऱ्या व्यक्तीचे बोलणे सुरू झाले.
या वर्षीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन कशा होणार? याविषयी होणार मार्गदर्शन
विविध फी आणि प्रोसेसिंगच्या नावाखाली संतोषकुमार आणि त्याचा साथीदार श्यामा यांनी संबंधित डॉक्टरकडून ऑनलाइन टप्प्याटप्प्याने ३० लाख १० हजार रुपये बॅंक खात्यावर जमा करून घेतले. त्यानंतर फोन बंद केला. रक्कम जमा करूनही त्यांना ‘एमडी’च्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही.
अवयवदानाची चळवळ "अनलॉक'च रुग्णांचे प्राण वाचविण्याबाबत वाढतेय जागृती
तसेच, आरोपींनी त्यांचे पैसे न देता फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक आर. आर. पाटील तपास करत आहेत.
Edited By - Prashant Patil