साखर विक्रीतील अभ्यासामुळे भीमा पाटसला 30 कोटींचा फायदा

रमेश वत्रे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

केडगाव (पुणे) : साखरेचा दर 2300 रूपये असताना आपण साखर विक्री थांबविली. त्यामुळे उसाचे बील वेळेत देता आले नाही. याची झळ सभासदांना बसली. मात्र हीच साखर आपण 3050 विकल्याने कारखान्याला तीस कोटी रूपयांचा फायदा झाला. सभासदांनी संयम ठेवल्याने याचे संपुर्ण श्रेय सभासदांना आहे. अशी माहिती भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी पत्रकारांना दिली. 

केडगाव (पुणे) : साखरेचा दर 2300 रूपये असताना आपण साखर विक्री थांबविली. त्यामुळे उसाचे बील वेळेत देता आले नाही. याची झळ सभासदांना बसली. मात्र हीच साखर आपण 3050 विकल्याने कारखान्याला तीस कोटी रूपयांचा फायदा झाला. सभासदांनी संयम ठेवल्याने याचे संपुर्ण श्रेय सभासदांना आहे. अशी माहिती भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी पत्रकारांना दिली. 

कारखान्याचे रोलर पुजन माजी संचालक शहाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर कुल पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, एक ऑक्टोबरपासून गाळप सुर होणार असून कारखान्याने 11 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. ऊस तोडणी कामगारांच्या 350 टोळ्या, 150 ट्रॅक्टर, 250 बैलगाडयांचे नियोजन करण्यात आले आहे. कारखान्यात दुरूस्तीची कामे वेगात चालू आहेत. ऊस तोडणी व वाहतुकीसाठी उचली दिल्या आहेत. गेल्या हंगामात भीमा पाटसची एफआरपी प्रती टन दोन हजार रूपये होती. ती संपुर्ण रक्कम सर्व ऊस उत्पादकांना देण्यात आली असून दिवाळीत सभासदांना उर्वरीत ऊस पेमेंट देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या विचाराधीन आहे.

कामगारांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पगार दिले जात आहेत. येत्या हंगामात दोन कोटी लिटर इथेनॅाल निर्मिती व तीन कोटी वीज युनीटची निर्मिती करण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. येणारा हंगाम गेल्या हंगामात अत्यंत अडचणीतील साखर कारखान्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 36 कोटी रूपयांची मदत केली. त्या विश्वासाला आम्ही पात्र झालो आहोत. अडचणीच्या काळात ज्यांनी कारखान्याला मदत केली त्यांच्या उस गाळपाला प्राधान्य देण्यात येईल. अतिरिक्त उसामुळे शेतक-यांमध्ये गाळपाबाबत चिंता आहे. मात्र संपुर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, कार्यकारी संचालक आबासाहेब निबे उपस्थित होते.   

  बँकेच्या कर्जाशिवाय हंगाम सुरू होईल 
भीमा पाटसला येणारा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी 30 कोटी रूपयांची गरज होती. योग्य वेळी साखऱ विक्रीच्या निर्णयामुळे सभासदांना एफआरपीची रक्कम देऊनही कारखान्याला 30 कोटी रूपये जादा मिळाले आहेत. कारखान्याकडे अद्याप दिड लाख पोती साखर शिल्लक आहेत. त्यामुळे यंदा हंगाम सुरू करण्यासाठी आम्हाला अद्याप कोणत्याही बँकेच्या दारात जावे लागले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, गिरीष बापट, महादेव जानकर यांचे सहकार्य व सभासदांचा विश्वासामुळे शेतक-यांच्या मालकीचा कारखाना अडचणीतून बाहेर पडू लागला आहे याचे मोठे समाधान आहे. असे कुल यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: Bima Pattsa benefited from Rs 30 crores due to the study of sugar sales: MLA's Tota