

Political Pressure Forces Pune Bio-CNG Project Closure
Sakal
पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर येथील ‘नोबल एक्स्चेंज इन्व्हायरो’ बायो–सीएनजी प्रकल्प बंद ठेवण्याचा आदेश पुण्यातील लोकप्रतिनिधींनी दिला होता. आता या राजकीय हस्तक्षेपामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ठेकेदाराचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी तब्बल २ कोटी ८१ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. ही रक्कम ठेकेदाराला देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.