पक्षी, प्राण्यांची तहान भागवूया! (व्हिडिओ)

सकाळ कार्यालय (बुधवार पेठ) - सर्प व पक्षी-प्राणीमित्र अक्षय शेलार (डावीकडील) आणि संजय तावरे चर्चा करताना.
सकाळ कार्यालय (बुधवार पेठ) - सर्प व पक्षी-प्राणीमित्र अक्षय शेलार (डावीकडील) आणि संजय तावरे चर्चा करताना.

पुणे - उन्हाळ्यात पक्ष्यांना बराच वेळ पाणी प्यायला मिळालं नाही, तर त्यांना त्रास होतो. मुलांनी पक्षी व प्राण्यांसाठी प्यायला पाणी उपलब्ध करून देऊन निसर्गमित्र व्हावं. यामुळे नकळतच फार मोठी निसर्गसेवा हातून घडू शकते. सर्प व पक्षी-प्राणिमित्र अक्षय शेलार आणि संजय तावरे यांनी ‘सकाळ’च्या बालमित्रांना हे आवाहन केलं आहे.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे पक्षी खाली पडतात. त्यामुळे त्यांना दुखापत होते. ते बेशुद्ध होऊ शकतात. अशा वेळी बालमित्रांनी त्यांना बरं करण्यासाठी लगेच एखाद्या पक्षीमित्राला बोलवावं. जवळ राहणाऱ्या पक्षिमित्रांचे दूरध्वनी क्रमांक आपल्याकडं असायला हवेत. ते नसतील तर अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. ती मंडळी आपल्या भागातील पक्षिमित्राला ताबडतोब तेथे पाठवतील, असं सर्प व पक्षी-प्राणिमित्र अक्षय शेलार यांनी सांगितलं.

संजय तावरे म्हणाले, ‘‘बालमित्रांनी गच्ची, कठडे किंवा बाल्कनीत पक्ष्यांना सहज दिसेल अशा जागी भांड्यांमध्ये पाणी ठेवावं. रसदार फळं ठेवावीत. उन्हाचा तडाखा बसून त्रास झालेल्या पक्ष्यांना ते पाणी पिऊन, खाऊ खाऊन तजेलदारपणा मिळू शकेल. पतंग उडविताना त्यासाठी वापरलेल्या मांज्यामुळे पक्षी जखमी होतात. त्यांचा गळा, पाय किंवा पंख कापले जातात. यासाठी काचेचा चुरा लावलेला मांजा वापरू नये. चिनी मांज्यानं आतापर्यंत किती तरी पक्ष्यांचा बळी घेतला आहे.’’

या दोघांनीही वेळोवेळी अनेक मुक्‍या जिवांची संकटातून सुटका करून त्यांना कात्रजमधील राजीव गांधी उद्यानातील  प्राणिसंग्रहालयाशी जोडलेल्या अनाथालयात नेलं आहे. तिथं जखमी पक्षी किंवा प्राण्यांवर औषधोपचार करून ते बरे झाल्यावर त्यांना रानात सोडलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com