‘फोटो व्हिजन’मध्ये ‘उडणारे पक्षी’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

पुणे - डरकाळी फोडणारा जंगलचा राजा सिंह, शिकारीच्या प्रयत्नात असलेला बिबट्या, कळपात चालणारे हत्ती अन्‌ निसर्गातील स्वच्छतादूत असणारा गिधाड, असे वन्यजीवांचे विविध पैलू शुक्रवारी ‘फोटो व्हिजन’ या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनातून उलगडले. 

पुणे - डरकाळी फोडणारा जंगलचा राजा सिंह, शिकारीच्या प्रयत्नात असलेला बिबट्या, कळपात चालणारे हत्ती अन्‌ निसर्गातील स्वच्छतादूत असणारा गिधाड, असे वन्यजीवांचे विविध पैलू शुक्रवारी ‘फोटो व्हिजन’ या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनातून उलगडले. 

‘शटरबग्ज्‌ फोटोग्राफी क्‍लब’ने आयोजिलेल्या या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या हस्ते झाले. माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, लेखिका विजया टेकसिंघानिया आणि क्‍लबचे अध्यक्ष सुमीत शहाणे या वेळी उपस्थित होते. या प्रदर्शनात ४० छायाचित्रकारांनी काढलेली ४०० हून अधिक छायाचित्रे पाहता येणार आहेत. वन्यजीव छायाचित्रांसह फुले, फुलपाखरे आणि निसर्ग छायाचित्रेही यात पाहावयास मिळतील. सुमीत शहाणे यांनी काढलेल्या ‘उडणारे पक्षी’ या संकल्पनेवर आधारित निवडक छायाचित्रेही पाहता येतील.

मोनिका सिंग म्हणाल्या, ‘‘पर्यावरणाचा ऱ्हास होताना त्याचे संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे वन्यजीव छायाचित्रकारांनी आपल्या छायाचित्रांतून त्यासाठी प्रयत्न करावेत. कलेच्या माध्यमातूनही संवर्धन होऊ शकते. त्यासाठी तंत्र आपल्याकडे असेल, तर आपण नक्कीच त्याचा फायदा घ्यावा. छायाचित्रकारांनी छायाचित्रांच्या माध्यमातून कलागुणांना वाव देण्यासह पर्यावरण संवर्धनासाठीही योगदान द्यावे.’’

प्रदर्शन रविवारपर्यंत (ता.३०) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत बालगंधर्व कलादालनात पाहावयास खुले राहील.

Web Title: bird fly in photo visison