बच्चे कंपनीला घडणार रंगेबिरंगी पक्षांचे दर्शन; 'सिंहगड फेस्टीव्हल'मध्ये पर्वणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

पक्षिनिरीक्षण 
दिनांक - १८ जानेवारी आणि १, ८,२२ फेब्रुवारी
वेळ - सकाळी ६.३० वाजता
ठिकाण - गोखले ‘मिस्ट’द, डोणजे

पुणे - थंडीच्या दिवसांमध्ये पुणे आणि परिसरात अनेक पक्षी येतात. शहरातील पक्षिनिरीक्षक, फोटोग्राफर्स हमखास या काळात पक्षिनिरीक्षणासाठी वेगवेगेळ्या ठिकाणी जातात. सर्वसामान्य पुणेकरांनाही पक्षिनिरीक्षणाचा अनुभव घेता यावा, यासाठी ‘सिंहगड फेस्टिव्हल’अंतर्गत १८ जानेवारी आणि १, ८, २२ फेब्रुवारीला पक्षिनिरीक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

या फेस्टिव्हलमध्ये पुणेकरांना सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या बर्ड व्हॅलिमध्ये पक्षिनिरीक्षण करता येणार आहे. ही ॲक्‍टिव्हिटी सर्वांसाठी विनामूल्य खुली असून, सर्व वयोगटांतील नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. या वेळी पक्षिनिरीक्षक प्रणव जोशी उपस्थितांना पक्षिनिरीक्षणाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सध्याच्या शहरी वातावरणात चिमणीही दिसणं अवघड झालेलं असताना, बच्चे कंपनीला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दाखवण्याची ही चांगली संधी आहे.

पुण्यातील ‘खडकवासला’ची वीज कधी होणार चालू वाचा

सोबतच, सिंहगड परिसरात असलेली संपन्न जैवविविधता पाहण्याचा अनुभवही या वेळी घेता येईल. पक्षिनिरीक्षणासाठी सर्वांनी १८ तारखेला सकाळी ६.३० वाजता डोणजे येथील गोखले ‘मिस्ट’ येथे जमायचे आहे. त्यानंतर सिंहगड पायथ्याशी असलेल्या अतकरवाडीजवळील बर्ड व्हॅलीमध्ये पक्षिनिरीक्षणासाठी जायचे आहे. हौशी पुणेकरांना थंडीतला सिंहगड अनुभवता यावा, यासाठी ‘गोखले कान्स्ट्रक्‍शन्स’ने सिंहगड फेस्टिव्हल आयोजित केला असून, ‘सकाळ’ त्याचा माध्यम प्रायोजक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird watching at Singhagad Festival