वॉचमनच्या मुलाला सायकल भेट देऊन 'ती'ने केला वाढदिवस साजरा

बिशप स्कूलमधील मुलीने जि.प. शाळेतील मुलाला सायकल भेट देऊन वाढदिवस साजरा केला.
Gift
GiftSakal

उंड्री : अलीकडे वाढदिवस म्हटले की डामडौल, हौसमौज, हॉटेलिंग असा काहीसा प्रकार डोळ्यासमोर उभा राहतो. मात्र, या सर्वांना फाटा देत उंड्री (ता. हवेली) येथील बिशप स्कूलमधील मुलीने जि.प. शाळेतील मुलाला सायकल भेट देऊन वाढदिवस साजरा केला.

उंड्री (ता. हवेली) कलरी सोसायटीमधील अनुश्री इटणकर बिशप स्कूलमध्ये आठवी इयत्तेमध्ये शिक्षण घेत असून, तिने उंड्रीतील जि.प. शाळेमध्ये इयत्ता सहावी अ मध्ये शिकत असलेल्या ज्ञानेश्वर विठ्ठल नामपल्ले या विद्यार्थ्याला सायकल भेट दिली. याप्रसंगी उंड्री जि.प. शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद थोरात, शिक्षक राजेंद्र कुंभारकर, उपशिक्षिका मुक्ता कटके, विठ्ठल नामपल्ले व अनुश्रीचे पालक सुरेंद्र इटणकर उपस्थित होते.

Gift
मुक्त विद्यालयात ५ वी आणि आठवीसाठी अर्ज भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत

दरम्यान, विट्ठल नामपल्ले सोसायटीमध्ये वॉचमन म्हणून नोकरी करतात. मुलाला शाळेत दररोज दोन-तीन किमी ये-जा करावी लागत आहे. मात्र, सायकल मिळाल्याने त्याचा वेळ वाचून अभ्यास चांगला करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com