बारामती - पोलिसांवर भाजप कार्यकर्त्यांची नाराजी

मिलिंद संगई
शनिवार, 12 मे 2018

बारामती : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत अतिरेक करणाऱ्या पोलिस दलावर आज भाजप कार्यकर्त्यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. अखेर जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी मध्यस्थी करुन मुख्यमंत्री व कार्यकर्त्यांची भेट घडवून आणल्यानंतर वातावरण काहीसे निवळले. मात्र तरीही वरिष्ठ महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईहून बारामती विमानतळावर येणार होते. तेथून नातेपुते येथे हणमंतराव सूळ यांच्या मुलाच्या लग्नासाठी ते जाऊन परत बारामती मार्गे पुण्याला जाणार होते. 

मुख्यमंत्री बारामतीत येणार असल्याने साहजिकच भाजपच्या नेत्यांसह अनेक प्रमुखांनी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी विमानतळाच्या आतल्या बाजूला ठराविक प्रमुख पदाधिका-यांचा अपवाद वगळता कोणालाच जाऊ दिले नाही. काही प्रमुख पदाधिका-यांनाही आत जाताना पोलिसांशी हुज्जत घालावी लागली. 

राज्यमंत्री राम शिंदे विमानतळाच्या आत जाताना त्यांच्याकडेही कार्यकर्त्यांनी तक्रार केली मात्र सुरक्षेचा मुद्दा असल्याने पोलिसांना सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले. भाजपचे जिल्हा पदाधिकारी अँड. नितिन भामे यांनी तर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणाच दिल्या. त्या नंतर वातावरण तणावाचे बनले. अखेर घोषणाबाजीनंतर राम शिंदे व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे बाहेर आले व त्यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक तेथे पोहोचले. त्यांनी सूत्रे स्वतःच्या हातात घेत मुख्यमंत्री व कार्यकर्त्यांची भेट घडवून आणतो अशी ग्वाही दिली. त्या नुसार मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी विनंती केल्यानंतर वातावरण निवळले. 

Web Title: bjp activist angry on police in baramati