
पुणे विमानतळावर एका प्रवाशाकडं रविवारी २८ जिवंत काडतुसं आढळली होती. पुण्याहून हैदराबादला जाण्यासाठी तो विमानतळावर आला असताना सुरक्षा रक्षकांनी तपासणी केली असता काडतुसं आणि मॅगझिन आढळल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकऱणी दीपक काटे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता यावरून संभाजी ब्रिगेडने दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे का असा सवाल केला आहे. तसंच संभाजी भिडे यांच्यासोबतच्या फोटोवरून संभाजी ब्रिगेडने भाजपवर टीका केलीय.