पुण्यात भाजपकडूनही आता हेल्मेटसक्तीला विरोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

पुणे -अन्य राजकीय पक्षांबरोबरच आता शहर भाजपनेही हेल्मेटसक्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हेल्मेटसक्तीला विरोध असून, जनभावनेच्या बाजूने आम्ही आहोत. त्यामुळे सक्तीऐवजी पोलिसांनी जनजागृती करण्यावर भर द्यावा. त्यासाठी लवकरच पक्षाच्या वतीने पोलिस आयुक्तांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे,’’ असे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानंतरही सक्ती सुरू राहिली, तर पंधरा जानेवारीपासून प्रत्येक चौकात भाजपचे कार्यकर्ते त्याबाबत जनजागृती करतील, असेही ते म्हणाले.

एक जानेवारीपासून शहरात हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. त्यास सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी देखील त्याबाबत नाराजी व्यक्‍त केली आहे. आज शहर भाजपने देखील हेल्मेटसक्तीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 

गोगावले म्हणाले, ‘‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे पुणेकर नाइलाजाने दुचाकीकडे वळले आहेत. महामार्गावर सक्ती समजू शकतो. तेथे कारवाई केल्यास कोणाचा विरोध नाही. शहरात त्याची गरज नाही. सक्ती करण्याऐवजी पोलिसांनी जनजागृती करण्यावर भर दिला पाहिजे. गल्लीबोळातदेखील कारवाई करणे योग्य नाही. यासंदर्भात पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. त्यांनतरही कारवाई सुरू राहिल्यास १५ जानेवारीनंतर भाजपचे कार्यकर्ते चौकात उतरून जनजागृती करतील.’’

Web Title: BJP also opposes helmets in pune