ग्रामंपचायतीचा धुरळा! इंदापुरात रंगलाय भाजप-राष्ट्रवादीमध्ये 'सामना'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

इंदापूर तालुक्याच्या राजकारणाची राज्यात चर्चा सुरु असते. राज्यमंत्री भरणे व माजी सहकारमंत्री पाटील यांच्यामध्ये चुरशीचे राजकारण नेहमीच सुरु असते. इंदापूर तालुक्यातील ११५ ग्रामपंचायती पैकी ६० ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता.

इंदापुर /वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा निकाल जाहीर झाला असून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने ६० पैकी ३७ ग्रामपंचायतीवर व भाजपने ३८ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये दावे-प्रतिदावे राजकारण सुरु झाले असून दोघांनीही १५ ग्रामपंचायतीवर समान दावे केल्यामुळे तालुक्यातील वातावरण तापू लागले आहे. 

इंदापूर तालुक्याच्या राजकारणाची राज्यात चर्चा सुरु असते. राज्यमंत्री भरणे व माजी सहकारमंत्री पाटील यांच्यामध्ये चुरशीचे राजकारण नेहमीच सुरु असते. इंदापूर तालुक्यातील ११५ ग्रामपंचायती पैकी ६० ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. निम्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणूका असल्यामुळे या निवडणूकांना महत्व प्राप्त झाले. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये जास्त ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवून तालुक्यावरती वर्चस्व ठेवण्याचा दोघांचा प्रयत्न आहे. ग्रामपंचायतीच्या निकालानंतर भरणे यांनी ३७  ग्रामपंचायती व भाजपने ३८ ग्रामपंचायतीवर दावे केल्यामुळे पेच निर्माण झाले आहे.दोघांच्या दाव्याची बेरीज ७५ होत असून प्रत्यक्षात ६० ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या आहेत.

PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी​

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने दावा केलेल्या ग्रामपंचायती...
सणसर,लासुर्णे, भांडगाव, गिरवी, पिंपरी बु, चाकाटी, काटी, सराफवाडी, शहा, तरंगवाडी, सपकळवाडी, अंथुर्णे,कळस, कौठळी, बळपुडी, रुई,भरणेवाडी, शेटफळगढे, निंबोडी, घोरपडवाडी, कुंभारगाव, पोंधवडी,  हगारेवाडी, निमगाव केतकी, कचरवाडी (निमगाव केतकी), चिखली,तक्रारवाडी, कडबनवाडी, जाचकवस्ती, सरडेवाडी, व्याहळी, पळसदेव, कळंब, निमसाखर, लोणी-देवकर, चांडगाव, पिंपळे 

भाजपने दावा केलेल्या ग्रामपंचायती...
सरडेवाडी, बाभुळगाव, गलांडवाडी-२, वरकुटे बु, जाधववाडी, रेडा, सराफवाडी,  पिटकेश्‍वर, भिगवण, तक्रारवाडी, पोंधवडी, शेटफळगढे, अकोले, निरगुडे, निंबोडी,  पिंपळे, भादलवाडी, कळंब, वालचंदनगर, नीरा नरसिंहपूर, गोंदी, टण्णू, पिठेवाडी, भोडणी, भांडगाव, कचरवाडी (बावडा),गाेतोंडी, हगारेवाडी, निमसाखर, दगडवाडी, निरवांगी, गलांडवाडी - १, नरुटवाडी, लाेणीदेवकर, भावडी, चांडगाव, बळपुडी, तावशी, सपकळवाडी

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

दोघांनी दावा केलेल्या ग्रामपंचायती...

भांडगाव, सराफवाडी, सपकळवाडी, बळपुडी, शेटफळगढे, निंबोडी, पोंधवडी, हगारेवाडी, तक्रारवाडी, सरडेवाडी, कळंब, निमसाखर, लोणी देवकर, चांडगाव, पिंपळे

प्रेयसीच्या पतीवर प्रियकरानेच केला प्राणघातक हल्ला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP and NCP have the same claim on 15 gram panchayats after Result Pune Gram panchayat Election 2021