भाजप-सेना युती सध्या तरी आहे, पुढे ही राहण्याची अपेक्षा : रविंद्र मिर्लेकर  

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 29 जुलै 2019

"आतापर्यंत तरी, आमची युती आहे, यापुढेही ती राहील हीच अपेक्षा." अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक व उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली

खडकवासला : "आतापर्यंत तरी, आमची युती आहे, यापुढेही ती राहील हीच अपेक्षा." अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक व उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

खडकवासला मतदार संघातील शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात केली. त्यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती असेल का,  या प्रश्नाबाबत उत्तर देताना त्यांनी स्मित हास्य करीत ही माहिती दिली.

"खडकवासला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. असे सर्वसामान्य माणसाला वाटत असेल तर हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा. अशी अपेक्षा करणे काही चुकीचे नाही." असे ही यावेळी मिर्लेकर यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाला पुण्याचे संपर्कप्रमुख बाळा कदम खडकवासला मतदारसंघाचे संपर्कप्रमुख  प्रीतम उपलभ,  जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, नितीन वाघ, भरत कुंभारकर, सुनील जगताप महेश मते, दीपक शेंडे, स्वाती ढमाले, भावना थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन  मनीष जगदाळे राजू चव्हाण यांनी केले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP and Shivsena is currently alliance and expected to remain so said ravindra mirlekar