भाजप भोरचा विकास करणार - महसूलमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

भोर - ‘‘भाजपचा करिष्मा अजूनही ओसरला नसून अनेक जण पक्षात प्रवेश करीत आहेत, त्यामुळे केंद्रात व राज्यात सरकार असलेल्या भाजपकडे भोर नगरपालिका आल्यास शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला जाईल,’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

शनिवारी रात्री भाजपच्या नगरपालिकेच्या प्रचारादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी प्रदीप खोपडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष समीर वाकणकर, तालुकाध्यक्ष गणेश निगडे, सचिन मांडके राजेंद्र शिळीमकर, बाळासाहेब गरुड, अमर बुदगुडे, सतीश शेटे व भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार दीपाली शेटे उपस्थित होत्या.  

पाटील म्हणाले, ‘‘नगरपालिकेत व तालुक्‍यात वर्षानुवर्षे सत्ता आणि आमदारकी असूनही काँग्रेसकडून भोरचा हवा तसा विकास झालेला नाही.

शहरात अद्यापही शुद्ध 
पाण्याचा पुरवठा नाही, रस्ते अरुंद आणि तरुणांकडे रोजगारच्या संधी नाहीत. नगरपालिकेचा विकास होण्यासाठी केंद्र व राज्याप्रमाणे एकाच पक्षाची सत्ता हवी आहे. भोरमध्ये सत्ता आल्यास शहरात चोवीस तास शुद्ध पाणी, तरुणांच्या रोजगारासाठी एम. आय. डी. सी. विशेष प्रयत्न केले जातील आणि सरकारच्या नवनवीन योजनांची अंमलबजावणी केली जाईल.’’ 

भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार दीपाली शेटे, नगरसेवक पदाचे उमेदवार सतीश शेटे, दत्तात्रेय झांजले, सचिन शिंदे, लता अंबडकर, राजाराम गुरव, लता शिवतरे, पंकज खुर्द, संजय खरमरे, वैशाली बांदल, शालिनी सागळे, प्रकाश पवार, मनीषा मोहिते व मनीषा राजीवडे या नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्यास त्यांच्यामार्फत शहराचा परिपूर्ण विकास केला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: BJP Bhor Development Chandrakant Patil