पर्वती : माधुरी मिसाळ विजयी; आमदारकीची हॅटट्रीक | Election Results 2019

BJP Candidate Madhuri Misal Won from Parvati Vidhansabha Constituency Pune
BJP Candidate Madhuri Misal Won from Parvati Vidhansabha Constituency Pune

पुणे : मागील 2 टर्म आमदार असलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यावेळीही आपला गड राखण्यात यशस्वी झाल्या आहेत. 36, 767 मतांनी त्यांनी राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना पराभूत केले आहे. मिसाळ यांना 97, 012 मतं मिळाली, तर कदम यांना 60, 245 मतं मिळाली आहेत. 

भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका अश्‍विनी कदम यांच्यात पर्वती मतदारसंघात मुख्य लढत होत आहे. 

मतदारसंघाच्या फेररचनेनंतर 2009 मध्ये पर्वती मतदारसंघ सर्व उमेदवारांसाठी खुला झाला. तेव्हापासून माधुरी मिसाळ या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. अश्‍विनी कदम यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविले आहे. 

गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसात कात्रज तलावातून वाहिलेले पाणी नाल्यातून या मतदारसंघातील अनेक घरांमध्ये शिरले होते. त्यासंदर्भातील चर्चा या मतदारसंघात निवडणुकीच्या काळात रंगली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com