‘विकासाचा बॅकलॉग भरून काढला’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

वडगाव शेरी -  ‘‘वडगावशेरी- कल्याणीनगर भागामध्ये पाच वर्षांपूर्वी विकासकामेच झाली नव्हती. हा ‘बॅकलॉग’ भाजपने भरून काढला असून, गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. या कामांमुळे वडगावशेरीत भाजपला यश निश्‍चित मिळेल,’’ असे मत नगरसेवक व  भाजपचे उमेदवार योगेश मुळीक यांनी व्यक्त केले.

वडगाव शेरी- कल्याणीनगर (प्रभाग ५) मध्ये भाजपचे उमेदवार योगेश मुळीक, संदीप जऱ्हाड, सुनीता गलांडे आणि शीतल शिंदे यांनी  टॅम्पो चौक आणि वडगावशेरी गावठाणात प्रचार केला. या प्रसंगी शिवाजी चांधारे, अर्जुन नरके, विष्णू चांधारे, दादा वाजे, नवनाथ गव्हाणे, राघवेंद्र कवी, विशाल शिंदे, नाचन काका, लखप्पा आदी उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, ‘‘वडगावशेरीत पाणी, रस्ते, पावसाळी पाइपलाइन अशा अनेक समस्या होत्या. सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासन दिले होते. यातील अनेक समस्या भाजपने गेल्या पाच वर्षांत सोडवल्या आहेत. प्रभाग चकचकीत केला आहे. विकासकामांमुळे वडगावशेरीची जनता भाजपला साथ देईल आणि येथे कमळच फुलणार आहे.’’

दरम्यान, वडगावशेरीतील सामाजिक संस्था, राजकीय प्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिकांचा भाजपला पाठिंबा वाढत आहे. या पाठिंब्यामुळे भाजपचा विजय निश्‍चित असल्याचे सुनीता गलांडे, संदीप जऱ्हाड, शीतल शिंदे यांनी सांगितले.

Web Title: bjp candidate yogesh mulik