भाजपकडून शेतकऱ्यांची फसवणूक : नाना काटे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

साडेबारा टक्के परताव्याचे आश्वासन देऊन अवघे साडेसहा टक्के प्राधिकरणातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे'', असा आरोप नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे. 

पिंपरी : ''साडेबारा टक्के परताव्याचे आश्वासन देऊन अवघे साडेसहा टक्के प्राधिकरणातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे'', असा आरोप नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे. 

विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार नाना काटे यांनी गुरुवारी (ता. १) स्वीकारला. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, जावेद शेख, डब्बु आसवानी, पंकज भालेकर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, यांच्यासह अनेक नगरसेवक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना नाना काटे म्हणाले, "केवळ विरोधाला विरोध म्हणून काम करणार नाही. मात्र चुकीच्या कामांना आमचा विरोध असणार आहे. शहरात कचरा समस्या बिकट झाली आहे. सत्ताधारी भाजपने बेस्ट सिटीची वेस्ट सिटी केली आहे. संपूर्ण शास्तीकर माफीचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र त्यांनी नागरिकांची फसवणूक केली आहे. हीच बाब प्राधिकरणातील शेतकऱ्यांच्या बाबतीत केली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने साडेबारा टक्के परताव्याचे आमिष दाखवले होते. मात्र प्रत्यक्षात साडेसहा टक्के देण्याची घोषणा केली आहे.

काटे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर विश्वास दाखविला आहे. यामुळे शहरातील तीनही विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचेच आमदार निवडून येतील, असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Cheated With Farmers Said Nana kate