गोळी झाडून पळ काढणे थांबवा

गोळी झाडून पळ काढणे थांबवा
Published on: 

गोळी झाडून पळ काढणे थांबवा

मतदारयाद्यांच्या दाव्यावरून भाजपची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली, ता. १८ (पीटीआय) : काँग्रेसने ‘गोळी झाडा आणि पळ काढा’ राजकारण थांबवायला हवे, अशी टीका भाजपने रविवारी केली.
संपूर्ण देश मतचोरीविरोधात रस्त्यावर उतरल्यामुळे राजकीय पक्षांना वाचता येतील, अशा मतदारयाद्या देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यावरून भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी दोन वर्षांपासून सातत्याने वाचता येतील, अशा मतदारयाद्यांसाठी पाठपुरावा करत असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. आठ वर्षांपासून आमची मागणी फेटाळण्यात येत होती. अखेरीस निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी आदेश देत मतदारयाद्या शोध घेण्यासाठी सुलभ अशा पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे, असे रमेश यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यावर भंडारी यांनी जोरदार टीका केली आहे. कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात एक लाख बनावट मतदार असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी केला होता. मात्र, त्याविषयी त्यांनी अद्याप औपचारिक तक्रार केलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीविषयी रमेश यांना फारसा विश्वास नाही, असेच या पोस्टमधून दिसत आहे,’ असे भंडारी यांनी म्हटले आहे.

‘आंदोलनांमुळे अस्थैर्याचा धोका’
लखनौ : कॉक्रोच जनता पक्ष आणि विरोधी पक्षांकडून नुकत्याच करण्यात आलेल्या आंदोलनांमुळे देशामध्ये अस्थैर्य आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊ शकते, असा धोका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केला आहे. अशा पद्धतीच्या प्रयत्नांमुळे देशाचे ऐक्य, एकात्मता आणि घटनात्मक चौकट कमकुवत होऊ शकते आणि ही गोष्ट कदापि मान्य करता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com