भाजप नगरसेवक, कार्यकर्त्यांचा "मैं हूँ डॉन...' गाण्यावर नृत्य 

BJP corporators and workers dance to the song I am don
BJP corporators and workers dance to the song I am don

पुणे - देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धडकताच गेल्या काही दिवसांपासून मरगळलेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. ग्रामदैवत कसबा गणपती येथे पेढेवाटप केले, शहर कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांनी व नगरसेवकांनी ""मैं हूँ डॉन...' या गाण्याच्या ठेक्‍यावर नाचत जल्लोष केला. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार येत्या दोन दिवसांत स्थापन होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. मात्र, शनिवारी सकाळीच फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने खळबळ उडाली. मुख्यमंत्रिपदावरून भाजप व शिवसेनेत संघर्ष पेटलेला होता. त्यात भाजपच्या गनिमी काव्यामुळे पक्षातील वातावरण बदलले. 

खासदार गिरीश बापट यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पेढ्यांचे वाटप करून आनंद साजरा केला. जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या पक्ष कार्यालयात शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने घोषणा देत जल्लोष सुरू केला. या वेळी तेथे साउंड बॉक्‍सवर ""मैं हूँ डॉन' या गाण्याच्या ठेक्‍यावर कार्यकर्त्यांनी नाचण्यास सुरुवात केली, तर महिलांनी फुगडी खेळून आनंदात भाग घेतला. 

अजित पवारांचा निर्णय योग्य 
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट जनादेश असूनही आमच्या मित्रपक्षाने केवळ मुख्यमंत्रिपदासाठी आमची 30 वर्षे जुनी मैत्री तोडली. आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य निर्णय घेऊन आम्हाला मदत केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com