पुणे : खोटे गुन्हे मागे घ्या, भाजपची पोलिसांकडे मागणी

BJP demand to  police to withdraw false charges clashes between bjp and ncp workers row
BJP demand to police to withdraw false charges clashes between bjp and ncp workers row

पुणे : काल भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) या गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमीत्त पुण्यात होत्या. पुण्यातील त्यांच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाप्रकरणी आज पुणे भाजप (BJP) शहराचे शिष्टमंडळाने डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणीू केली

यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते हे घुसले होते. स्मृती इराणी यांच्यावर हल्ला करण्याचा त्यांचा कट होता का? यांच्या विरोधात पोलिसांनी कृती केली नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणी यांच्या ताफ्यावर हल्लां कराण्याचा प्रयत्न केला, तिथे ही पोलिसांनी कुठली ही कारवाई केली नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

BJP demand to  police to withdraw false charges clashes between bjp and ncp workers row
मुख्यमंत्र्यांची RSS वर टीका; पुण्यातील नाराज शिवसेना नेत्याचा पक्षाला रामराम

बालगंधर्व इथे असलेल्या कार्यक्रमात देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप कार्यकर्त्यांना शिवीगाळ झाली, राष्ट्रवादीने शहराची संस्कृती बिघडवून टाकली आहे आणि गालबोट लावले आहे राजकारण खालच्या स्थरावर त्यांनी नेल आहे. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप भाजप नेत्यांनी केला. तसेच भाजपकडून कार्यकर्त्यांवर करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या सोबतच ज्यांनी स्मृती इराणी यांच्यावर हल्ला केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी पोलिसांकडे करण्यात आली.

BJP demand to  police to withdraw false charges clashes between bjp and ncp workers row
आता महाराष्ट्रातून भाजपचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com